दादा मतदार म्हणून नाव नोंदवण्यासाठी आता वर्षातून ४ संधी..

तरुणांनो तुमचे नाव मतदार यादीत नोंदणी केली का..?

मतदान हा आपला महत्त्वाचा हक्क, अधिकार आहे. त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे. आपल्या देशाने लोकशाही स्वीकारली आणि आपण ही पद्धती अजूनही टिकवून ठेवली आहे. लोकशाहीने अनेक सुविधा, अधिकार, हक्क आपल्याला दिले आहेत. एक सुजाण नागरिक म्हणून आपल्याला वाटत असेल, तर कोणतीही सबब न सांगता प्रत्येकाने मतदान करावे.तर आपण आपल्या घरातील १८ वर्ष वय असलेल्या व्यक्तीची व जवळच्या लोकांनची नोंदणी करणे खूप महत्वाचे आहे.

मतदार म्हणून नाव नोंदवण्यासाठी आता वर्षातून ४ संधी मिळाली आहे.
१ जानेवारी , १ एप्रिल , १ जुलै , १ ऑक्टोबर जर तुम्ही या पैकी कोणत्याही महिन्याच्या १ तारखेला किंवा त्याच्या आधी १८ वर्षाचे होणार असाल तर त्या त्या तिमाहीत अर्ज क्र . ६ भरून मतदार नोंदणी करू शकता

दादा मतदार म्हणून नाव नोंदवण्यासाठी आता वर्षातून ४ संधी..

सदर नोंदणी कशी करावी हे खालील प्रमाणे.

नवीन मतदार नोंदणीसाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :

➡️ मतदार सेवा पोर्टल :
www.voterportal.eci.gov.in किंवा www.nvsp.in

➡️ वोटर हेल्पलाइन अ‍ॅप :

प्ले स्टोअर लिंक ( Andriod मोबाईलकरीता )
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen

आयफोन स्टोअर ( I-phone मोबाईलकरीता )
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004

8 thoughts on “दादा मतदार म्हणून नाव नोंदवण्यासाठी आता वर्षातून ४ संधी..”

Leave a Comment

error: Content is protected !!