पुढच्या वाटेला डोळयांची साथ
द्या पण काळजी घ्या…

जाणून घ्या संवेदनशीलाची लक्षणं आणि त्यावरील उपचार
डोळे येणे (कंजक्टिवाईटीस) हा एक प्रकारचा संसर्गजन्य रोग आहे, जो विशेषतः पावसाळ्यात होतो. कधी दोन्ही डोळ्यांवरही त्याचा संसर्ग होतो.
लक्षणे कोणती?
१) खाज येणे
२)चिकटपणा जाणवणे
३)डोळ्यांना सूज येणे
४)डोळे लालसर होणे
५)डोळ्यातून पिवळा द्रव बाहेर येणे
काय काळजी घ्याल ?
१) डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतत धुवा.
२)इतर व्यक्तिच्या रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने आपले डोळे पुसू नका.
३)डोळ्यांना सतत स्पर्श करू नये.
४)घराबाहेर जाताना गॉगल वापरा.
५)संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्र तज्ञांचा सल्ला घ्यावा.