Divyang Vyktina Firtya E-Vehicle Yojna : राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई- व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेची अंमलबजावणी संदर्भाने दिव्यांग अर्जदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्या करिता सदर नोंदणी पोर्टल हे दि. ०३.१२.२०२३ ते दि. ०४.०१.२०२४ सकाळी १० वाजे पर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक : +९१८०३५७४२०१६
Helpline Email.: evehiclehelpdesk@gmail.com
योजनेच्या अटी व शर्ती –
१. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
२. अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान ४०% टक्के असावे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक / सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्रधारक असावा.
३. अर्जदारा कडे दिव्यांगत्वाचे UDID प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
४. अर्जदारदि.०१.०१.२०२४ या अहर्ता दिनांकाच्या दिवशी १८ ते ५५ या वयोगटातील असावा.
५. मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील.
६. दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्नरु. २.५० लाख पेक्षा अधिक नसावे.
७. लाभार्थी निवड करताना जास्त अपंगत्व असलेल्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे निवडीचा क्रमहा अतितीव्र दिव्यांगत्व ते कमी दिव्यांगत्व या क्रमाने राहील.
८. अतितीव्र दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालविण्याचा परवाना नाकारला असल्यास अशा परिस्थितीत देखील परवानाधारक नसलेल्या अतितीव्र दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत सोबत्याच्या (Escort) सहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल.
९. अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधीत वाहनाची योग्यती काळजी घेण्याचे बंधपत्र सादर करणे आवश्यक आहे.
१०. अर्जाचा वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.
११. जिल्हानिहाय लाभार्थ्यांची घोषणा दिव्यांगांच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल.
१२. अर्जदार हा शासकीय/निमशासकीय/मंडले/महामंडळे यांचा कर्मचारी नसावा.
१३. या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तरतो थकबाकीदार नसावा.
हे पण वाचा : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना २०२३-२४
आवश्यक कागदपत्र –
१) अर्जदाराचा फोटो
२) अर्जदाराची स्वाक्षरी
३) जातीचा दाखला
४) अधिवास प्रमाणपत्र
५) निवासी पुरावा
६) दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र
७) UDID प्रमाणपत्र
८) ओळखपत्र
९) बँक पासबुकचे पहिले पान
१०) अर्जदाराचे प्रतिज्ञापत्रक
ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत खालील स्टेप्स वापरून अर्ज करा –
१. सूचना वाचणे.
२. प्रथमच वापरकर्त्याची नोंदणी.
३. ऍप्लिकेशन पोर्टलवर लॉगिन (साइन-इन) करणे.
४. अर्ज भरणे आणि कागदपत्रे अपलोड करणे.
५. फॉर्मचे पुनरावलोकन करणे, घोषणा तपासणे आणि फॉर्म सबमिट करणे.
६. अर्ज ऑनलाईन सबमिशनची पोचपावती.
टिपी – पोर्टल उघडल्यानंतर, फॉर्म भरण्याच्या सूचना प्रदर्शित केल्या जातील. नोंदणी करण्यापूर्वी आणि फॉर्म भरण्यापूर्वी प्रत्येक प्रथमच वापरकर्त्याने या सूचना वाचणे आवश्यक आहे. प्रथमच वापरकर्त्याने नोंदणी/लॉगिन बटणावर क्लिक केल्यानंतर वापरकर्त्यास साइन-अप/साइन-इन पृष्ठावर निर्देशित केले जाईल ओटीपी पाठवा बटनावर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतर, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक पाठविला जाईल.
हे पण वाचा : शेतकरी मित्रांसाठी भारत सरकार मोसम विज्ञान विभागा कडून मौसम अँप तयार केले आहे लगेच डाउनलोड करा.
ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट | Apply Online |
अर्ज करण्यासाठी सूचना व योजना PDF | डाऊनलोड करा |

मित्रांनो या लेखांमध्ये दिव्यांग बांधव यांच्यासाठी मोफत ई–व्हेईकल योजना बद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. या योजनेसाठी पात्र असलेले उमेदवार कशा पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व नियम,अटी,पात्रता व अर्ज कसा करायचा याबद्दलची माहिती दिलेली आहे. तरीही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवार यांना जास्तीत जास्त शेअर करा.
