नमस्कार मित्रानो मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी राज्यात सुरू असलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने निजामकालीन पुरावे उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच राज्य सरकारच्या यंत्रणेने संशोधन करून मिळवलेले पुरावे प्रतेक जिल्हा संकेतस्थळावर टाकण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ सुरू करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे आता मराठा समाजाच्या कुणबी नोंदी थेट आपल्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर पाहायला मिळणार आहेत. त्या आधारे कुणबी प्रमाणपत्र काढणे सोपे जाणार आहे. ज्याप्रमाणे सातबाराविषयीची माहिती किंवा शेतीच्या नोंदीची माहिती ऑनलाइन उपलब्ध होते; त्याच धर्तीवर हे काम करण्याची सूचना ‘एनआयसी’ला करण्यात आले होते.अशा प्रकारे हे पुरावे उपलब्ध करून दिले आहे. लोकांना त्यांची नोंद ‘कुणबी’ म्हणून आहे किंवा नाही हे स्वत: तपासता येणार आहे.
महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण ३६ जिल्हे आहेत. आमचे ध्येय एकच आहे की एकच ठिकाणी आपल्याला सम्पूर्ण राज्यातील नोदी एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात त्यासाठी एक छोटासा प्रयत्न.
चला तर आपण आता आपल्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करुण मराठा कुणबी नोंदी बघुयात .
मित्रांनो, मी आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल, व ही माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर ही माहिती महत्व पूर्ण वाटली असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा.
5 thoughts on “मराठा समाजाच्या कुणबी नोंदी थेट वेबसाईटवर बघा | Check kunbi records of Maratha community directly on the website”