
राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास मा. मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे.
सरकारतर्फे ज्येष्ठ नागरिकांकरता नवनवीन योजना राबवल्या जातात. सरकार द्वारे ज्येष्ठ नागरिकांकरिता नवीन योजना राबवली जात आहे. या योजनेच्या अंतर्गत सर्व ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून सरकार प्रत्येक वर्षाला राज्य शासन एवढी आर्थिक मदत ज्येष्ठ नागरिकांना करणार आहे.
या योजने करता कशा पद्धतीने अर्ज करावा ? योजनेचा लाभ मिळवण्याकरता पात्रता व निकष काय असेल ? यामध्ये लाभ फायदे काय काय मिळणार ? याबाबतची संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत.

हे पण वाचा : मराठा समाजाच्या कुणबी नोंदी थेट वेबसाईटवर बघा.
मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र
| योजनेचे नाव | Mukhyamantri Vayoshri Yojana |
| उद्देश | महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत करणे. |
| लाभ | ३ हजार रुपये आर्थिक मदत |
| लाभार्थी | राज्यातील ज्येष्ठ नागरिक |
| वयाची अट | अर्जदाराचे वय हे ६५ वर्षा पेक्षा जास्त असावे. |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
| अधिकृत संकेतस्थळ | Click here |

मुख्यमंत्री वयोश्री योजने करता पात्रता व निकष (Mukhyamantri Vayoshri Yojana)
महाराष्ट्र मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून सहभागी होण्याकरिता शासनाद्वारे वेगवेगळ्या पात्रता तसेच निकष ठरविण्यात आलेले आहे. यानुसार जी व्यक्ती पात्र ठरणार त्या व्यक्तींना त्या योजनेचा लाभामध्ये सहभागी होता येणार आहे.
1. ज्येष्ठ नागरिकांचे वय हे किमान 65 वर्ष असावे.
2. ज्येष्ठ नागरिकांची वार्षिक उत्पन्न हे २ लाखांपेक्षा कमी असायला हवे.
3. अर्जदार हा महाराष्ट्र राज्यांमधील कायमस्वरूपी रहिवासी असावा.
4. निवड / निश्चित केलेल्या जिल्हयात, लाभार्थ्यांच्या संख्येपैकी ३० टक्के महिला असतील. सदर व्यक्तीने मागील ३ वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे.
ज्यांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना वरील पात्रता व निकष पूर्ण करणे आवश्यक ठरणार आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे लाभ व फायदे (Mukhyamantri Vayoshri Yojana)
ज्येष्ठ नागरिकांचे वयोमान अपंगत्व अशक्तपणाच्या निराकारणाकरता आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी योजना
- मानसिक स्वास्थ्य संतुलन ठेवण्यास करिता मन स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन, प्रशिक्षणाचा सुद्धा समावेश
- वार्षिक 480 कोटी राज्य सरकार खर्च करणार
- ३००० रुपये थेट खात्यात डीबीटीने जमा
- रुपये २ लाख मर्यादित वार्षिक उत्पन्न असणारे 65 वर्षांवरील वृद्ध लाभार्थी
मुख्यमंत्री वयोश्री योजना साठी आवश्यक कागदपत्रे (Mukhyamantri Vayoshri Yojana)
मुख्यमंत्री व वयोश्री योजने करता लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे दिलेले आहे.
- आधार कार्ड / मतदान कार्ड
- राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचे २ फोटो
- स्वयं-घोषणापत्र
- शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे.
वर दिलेल्या प्रमाणे आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. तुम्ही जेव्हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना तुम्हाला ही कागदपत्रे सादर करावे लागणार आहे.
हे पण वाचा : शेतकरी मित्रांसाठी भारत सरकार मोसम विज्ञान विभागा कडून मौसम अँप तयार केले आहे लगेच डाउनलोड करा.
मुख्यमंत्री वयोश्री योजने करता ऑनलाइन अर्ज Mukhyamantri Vayoshri Yojana
योजने संबंधित मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेला असून परंतु याची अर्ज प्रक्रिया अजून सुरू करण्यात आलेले नाही. नवीन अपडेट आल्यावर आम्ही तुम्हाला “मुख्यमंत्री वयोश्री योजने” करता ऑनलाइन अर्ज कशा पद्धतीने करायचा याची सविस्तर माहिती लवकरच देणार आहोत.
सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड, योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख करण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागाकरीता जिल्हाधिकारी व शहरी भागाकरीता आयुक्त, महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली पुढीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येईल.
अ ) महानगरपालिका स्तर :
| अध्यक्ष | आयुक्त, महानगरपालिका |
| सदस्य | वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका, महिला व बालविकास अधिकारी |
| सदस्य सचिव | सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण |
ब) जिल्हा स्तर :-
| अध्यक्ष | जिल्हाधिकारी |
| सह-अध्यक्ष | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद |
| सदस्य | जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य विभाग, सहसंचालक/समकक्ष अधिकारी महिला व बालविकास |
| सदस्य सचिव | सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण/जिल्हा समाजकल्याण अधिकारी |
धन्यवाद..


हे पण वाचा :
तरुणांनो तुमचे नाव मतदार यादीत नोंदणी केली का..?
शेतकरी मित्रांसाठी भारत सरकार मोसम विज्ञान विभागा कडून मौसम अँप तयार केले आहे लगेच डाउनलोड करा.
दादा ! दशपर्णी अर्क आपण घरी तयार करूया..
Good appreciable step
By the Government.
Thanks lot.