आता घरपोच शासकीय वाळू मिळवा फक्त ६०० रूपये प्रतीब्रास | Ata Gharpoch Shasakiy Valu Milava Fakt 600 Rupaye Pratibras

आता घरपोच शासकीय वाळू मिळवा फक्त ६०० रूपये प्रतीब्रास | Ata Gharpoch Shasakiy Valu Milava Fakt 600 Rupaye Pratibras

आता घरपोच शासकीय वाळू मिळवा फक्त ६०० रूपये प्रतीब्रास – मित्रांनो, आपल्या राज्यातील वाळू चोरी, वाळू वाहतूक आणि बेकायदा वाळू उपसा याला आळा घालण्यासाठी, वाळू लिलाव बंद करण्यासाठी, वाळूचे दर यासोबतच अवैध वाळू वाहतूक या बाबतच्या सर्व अडचणी लक्षात घेऊन वाळू उपलब्धता आणि अवैध वाळू उपसा यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वसमावेशक वाळू धोरण 1 मे 2023 पासून लागू करण्यात आले आहे. या धोरण मार्फत लाभार्थ्यांना व देशातील नागरिकांना 600 रुपये प्रति ब्रास म्हणजेच 133 रू प्रति मेट्रिक टन या दराने तर घरकुल योजना घेतलेल्या लाभार्थ्यांना 5 ब्रास इतकी वाळू / रेती मोफत स्वरूपाने दिली जाणार आहे. याबाबतच काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर मध्ये वाळू डेपो निर्माण करून लाभार्थ्यांना 4 ब्रास रेती वितरण करण्यात आले.

अश्याच प्रकारे जिल्हा, तालुका, गाव इतर ठिकाणी ही रेतीचे डेपो निर्माण करून रेती वितरण सुरू केले जाणार आहे. मात्र या रेतीच्या मागणीसाठी नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी नागरिक महाखनिजच्या पोर्टल वर जाऊन किंवा आपल्या जवळच्या CSC आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन ही मागणी अर्ज करू शकता. यासाठी तुमच्या कडे आधार कार्ड नंबर असणे गरजेचे आहे. आता महाखनिज च्या पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने वाळू मागणी अर्ज कसा करायचा ते पुढे पाहुया.

  • ऑनलाईन पद्धतीने वाळू / रेती नोंदणी कशी करायची.
  • महाखनिज ऑफिशियल वेबसाईट

ऑनलाईन पद्धतीने वाळू / रेती नोंदणी कशी करायची.

स्टेप 1:  मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला महाखनिजच्या ऑफिशियल वेबसाईट ला भेट द्यायची आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
आपल्या तालुक्याच्या डेपोत वाळू / रेती उपलब्ध आहे का ते बघा.चेक करा

स्टेप 2:  आता वेबसाईट च्या होम पेज वर तुम्हाला Sand Booking ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.

स्टेप 3:  तर आता रेती बुकिंग करण्यासाठी Login ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 4:  आता नेक्स्ट पेज वर युजर आयडी व पासवर्ड विचारला जाईल. तुम्ही जर पोर्टल वर नवीन असाल तर तुम्हाला तुमचं युजर आयडी व पासवर्ड तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी Consumer Sign Up ऑपशन वर क्लिक करा आणि नंतर तुमचे नाव, ई-मेल आयडी व मोबाईल नंबर टाकायचा आहे.

Advertising

स्टेप 5:  मित्रांनो, मोबाईल नंबर व्हेरिफाय करण्यासाठी तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठविला जाईल. तो ओटीपी टाकून सबमिट करायचे आहे. व तुमचे रेजिस्ट्रेशन पूर्ण होऊन जाईल. मित्रांनो, इथे तुमचा मोबाईल नंबर च लॉगिन आयडी असणार आहे.

स्टेप 6:  आता तुमच्या ई-मेल वर एक लिंक येईल त्यावर जाऊन तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे किंवा तुमच्या मोबाईल नंबर व ओटीपी सह लॉगिन (USE OTP) करून पासवर्ड तयार करू शकता. त्यासाठी लॉगिन आयडी टाकून आलेला ओटीपी टाकायचा आहे व नंतर दिलेला कॅपचा टाकायचा आहे. व नंतर Login बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 7:  मित्रांनो, आता तुम्हाला तुमचे प्रोफाइल मध्ये संपूर्ण माहिती भरण्यासाठी उजव्या बाजूला दिलेल्या Edit ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 8:  आता या प्रोफाइल मध्ये तुमचे नाव, मोबाईल नंबर वगैरे माहिती आलेली दिसेल. आता बाकीची माहिती भरायची आहे. इथे तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका, गाव निवडायचे आहे व पिनकोड टाकून नंतर तुमचा पत्ता टाकायचा आहे. आता तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे. ज्यात पॅन कार्ड, रेशन कार्ड, आणि सर्वात महत्त्वाचे तुमचे आधार कार्ड अपलोड करायचे आहे. नंतर फोटो अपलोड करायचा आहे. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमचा GST नंबर ही तुम्ही देऊ शकता. व शेवटी Update बटन वर क्लिक करायचे आहे.

Advertising

स्टेप 9:  आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमची सर्व माहिती अपलोड झालेली दिसेल व तुमचे प्रोफाइल पूर्ण होऊन जाईल. आता तुम्हाला Project Registration करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला Register Project या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. प्रोजेक्ट रजिस्टर म्हणजे तुम्ही कोणत्या घर/ बिल्डिंग साठी वाळू बुक करणार आहे त्याची माहिती असते.

स्टेप 10:  आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला प्रोजेक्ट बद्दल माहिती टाकायची आहे. यात Project Type टाकायचा आहे म्हणजे हा प्रोजेक्ट तुम्ही कशासाठी करताय जसे की स्वतःच घर आहे, घरकुल आहे, गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे की प्रायव्हेट प्रोजेक्ट आहे ते सिलेक्ट करायचे आहे. जर तुम्ही स्वतःच्या घराचे प्रोजेक्ट करत आहात तुमचे नाव, पत्ता वगैरे सर्व माहिती येईल. या नंतर आता तुम्ही तुमच्या घराचे नाव द्यायचे आहे. कन्स्ट्रक्शन टाइप टाकायचे आहे, बिल्डिंग आहे की कम्पाउंड आहे की दुसरे काही ते सिलेक्ट करून टाकायचे आहे.या प्रोजेक्ट साठी तुम्हाला किती वाळू/ रेती लागणार आहे ते टाकायचे आहे व नंतर साईट चा पत्ता टाकायचा आहे. तुम्ही इथे मॅप वरून डायरेक्ट तुमचे लोकेशन टाकू शकता. त्या नंतर खाली Submit बटन वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमचे प्रोजेक्ट रेजिस्ट्रेशन सक्सेसफुली होऊन जाईल.

हे पण वाचा : शेतकरी मित्रांसाठी भारत सरकार मोसम विज्ञान विभागा कडून मौसम अँप तयार केले आहे लगेच डाउनलोड करा.

स्टेप 11:  मित्रांनो, आता तुम्हाला वाळू बुकिंग करायची आहे त्यासाठी Book Sand या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 12:  त्या नंतर तुम्हाला Select Project या ऑप्शन मध्ये तुमचा प्रोजेक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्या नंतर किती ब्रास रेती लागणार आहे ते टाकायचे आहे. आणि नंतर रेतीचा डेपो तुमच्या पासून किती किलोमीटर लांब आहे ती अंतर टाकायचे आहे. व नंतर Search ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 13:  मित्रांनो, जर तुम्ही सर्च केलेल्या ठिकाणी डेपोत रेती नसेल तर तुम्हाला इथे काहीच माहिती दाखवली जाणार नाही. आणि जेव्हा डेपोत रेती येईल तेव्हा तुम्हाला इथे दाखवले जाईल.

स्टेप 14:  आत्ता तुम्हाला जी स्टॉक ची माहिती दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर एक स्क्रीन ओपन होईल त्यामध्ये बुकिंग ची माहिती तपासून Confirm Booking बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 15:  बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट साठी पुढे जायचे का ते विचारले जाईल, तुम्ही Yes बटन वर क्लिक करून तुमच्या आवडत्या पेमेंट मेथड निवडून पेमेंट करू शकता.

हे पण वाचा : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना २०२३-२४

मित्रांनो, याशिवाय तुम्ही Track Order या ऑप्शन च्या साहाय्याने तुम्ही ऑर्डर केलेली वाळू कुठं पर्यंत आली आहे ते चेक करू शकता. किंवा Transporter या ऑप्शन मध्ये तुम्ही वाळू ट्रान्सपोर्ट करणाऱ्याला कॉल ही करू शकता.

मित्रांनो, मी आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल, व ही माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर ही माहिती महत्व पूर्ण वाटली असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद..

आता घरपोच शासकीय वाळू मिळवा फक्त ६०० रूपये प्रतीब्रास | Ata Gharpoch Shasakiy Valu Milava Fakt 600 Rupaye Pratibras
आता घरपोच शासकीय वाळू मिळवा फक्त ६०० रूपये प्रतीब्रास | Ata Gharpoch Shasakiy Valu Milava Fakt 600 Rupaye Pratibras

हे पण वाचा :

तरुणांनो तुमचे नाव मतदार यादीत नोंदणी केली का..?

शेतकरी मित्रांसाठी भारत सरकार मोसम विज्ञान विभागा कडून मौसम अँप तयार केले आहे लगेच डाउनलोड करा.

दादा ! दशपर्णी अर्क आपण घरी तयार करूया..

2 thoughts on “आता घरपोच शासकीय वाळू मिळवा फक्त ६०० रूपये प्रतीब्रास | Ata Gharpoch Shasakiy Valu Milava Fakt 600 Rupaye Pratibras”

Leave a Comment

error: Content is protected !!