गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना २०२३-२४ | Gopinath Munde Surksha Sanugrah Anudan Yojana 2023-24

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना काय आहे ?

नमस्कार शेतकरी मित्रानो सन २००५-०६ पासून ते सन २००८-०९ पर्यंत सदर योजना शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना या नावाने कार्यान्वित होती. सन २००९-१० पासून सदर योजनेचे नानानिधान शेतकरी जनता अपघात विमा योजना असे करण्यात आले.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना २०२३-२४
Gopinath Munde Surksha Sanugrah Anudan Yojana 2023-24

सन २०१५-१६ पासून सदर योजना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या नावाने कार्यान्वित आहे. परंतु आजपर्यत सदर विमा योजना हि विमा कंपनी व विमा सल्लागार कंपनीनार्फत राबविण्यात येत होती.

विमा कंपन्याकडून प्रस्ताव अनावश्यक कारणास्तव नाकारणे, वेळेत दाद मंजूर न करणे, इत्यादी कारणास्तव अपघातग्रस्त शेतकरी / शेतकरी कुटुंब आर्थिक लाभापासून वंचीत राहत होते. याअनुषंगाने प्रचलित गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करुन “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना” राबविण्याबाबत दि. १७/३/२०२३ रोजी मा. मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे.

 ● लाभार्थी –

१) राज्यातील सर्व वहिती धारक खातेदार शेतकरी.

२) खातेदार शेतकरी त्यांच्या कुटुंबातील वहीती धारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य असे १० ते ७५ वयोगटातील एकूण दोन व्यक्ती (आई-वडील, शेतकऱ्याची पती-पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी यापैकी एक व्यक्ती)

● लाभाचे स्वरुप – योजनेंतर्गत देय लाभ सदर योजनेअंतर्गत अपघात ग्रस्त शेतकऱ्यांना / त्यांच्या कुटुंबियांस प्रकरणपरत्वे खालील प्रमाणे लाभ अनुज्ञेय राहील.

१) अपघाती मृत्यू – रु. २,००,०००/-

२) दोन डोळे अथवा दोन हात अथवा दोन पाय रु.२,००,०००/-

३) एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास रु.२,००,०००/-

४) एक डोळा अथवा एक हात/एक पाय निकामी झाल्यास रु.१,००,०००/-

● योजनेमध्ये समाविष्ठ योजनेमध्ये समाविष्ठ असलेल्या बाबी :-

१) रस्ता / रेल्वे अपघात

२) पाण्यात बुडुन मृत्यू

३) जंतुनाशके हताळताना अथवा अन्य कारणाने विषबाधा

४) विजेचा धक्का बसल्याने झालेला अपघात

५) विज पडून मृत्यू

६) खुन

७) उंचावरुन पडून झालेला अपघात

८) सर्पदंश व विंचूदंश

९) नक्षलाईट कडून झालेल्या हत्या

१०) जनावरांच्या खाल्यामुळे / चावल्यामुळे

● अंतर्गत लाभ प्राप्त होण्यासाठी प्रस्तावासोबत (क्लेम फॉर्म, भाग-१) खालील कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.

१) ७/१२ उतारा

२) मृत्यूचा दाखला

३) शेतकऱ्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गांव नमुना नं. ६ क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद

४) वारसदाराचे ओळखपत्र : आधारकार्ड/ पॅनकार्ड/बँक पासबुक/निवडणुक ओळखपत्र

५) अपघातग्रस्ताचा वयाचा दाखला जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला/शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र / ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र /आधार कार्ड/पॅन कार्ड/वाहन चालविण्याचा परवाना निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र / पारपत्र

६) प्रथम माहिती अहवाल / घटनास्थळ पंचनामा / पोलिसपाटील माहिती अहवाल

७) अपघाताच्या स्वरुपानुसार अंतिम प्रस्तावासोबत सादर करावयाचे कागदपत्र (पपत्र-अ)

● अर्ज कूठे सादर करावा – संबंधित अपघातग्रस्त शेतकरी / शेतकऱ्यांचे वारसदार यांनी सर्व निर्धारीत कागदपत्रांसह परिपुर्ण प्रस्ताव संबंधित तालुका कृषि अधिकारी यांचेकडे ३०

शासन आदेश GR डाउनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना २०२३-२४ | Gopinath Munde Surksha Sanugrah Anudan Yojana 2023-24

अर्ज डाउनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना २०२३-२४ | Gopinath Munde Surksha Sanugrah Anudan Yojana 2023-24

संदर्भ : जा. क्र : कृषि/मासु/गोमुशेसाअयो/सां.९/१६५६६/२०२३, दिनांक :- १७ /०५/२०२३ कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-४११००१

संदर्भ : शासन निर्णय क्रमांक शेअवि-२०२०/प्र.क्र.३३०/११ओ, दि.१९ एप्रिल, २०२३

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना २०२३-२४ | Gopinath Munde Surksha Sanugrah Anudan Yojana 2023-24

हे पण वाचा :

तरुणांनो तुमचे नाव मतदार यादीत नोंदणी केली का..?

शेतकरी मित्रांसाठी भारत सरकार मोसम विज्ञान विभागा कडून मौसम अँप तयार केले आहे लगेच डाउनलोड करा.

दादा ! दशपर्णी अर्क आपण घरी तयार करूया..

6 thoughts on “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना २०२३-२४ | Gopinath Munde Surksha Sanugrah Anudan Yojana 2023-24”

Leave a Comment

error: Content is protected !!