
दि – ०५ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत संत सेवालाल महाराज बंजारा,लमाण तांडा समृध्दी योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
हे पण वाचा : मराठा समाजाच्या कुणबी नोंदी थेट वेबसाईटवर बघा.
या योजनेत तांड्यांमध्ये प्राथमिक मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. सध्या स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी तांडा भागासाठी किमान एक हजार इतकी लोकसंख्या आणि दोन गावांतील तीन किलोमीटर अंतर असणे आवश्यक आहे. यातील ही दोन गावांतील तीन किलोमीटर अंतराची अट शिथील करण्यात येईल. या योजनेसाठी पाचशे कोटीं रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल. याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार असून, ही समिती बंजारा, लमाण तांडा घोषित करणे, गावठाण जाहीर करणे, तांड्यांना महसुली गाव घोषित करणे तसेच ग्रामपंचायत स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करणे या अनुषंगाने कार्यवाही करेल.
हे पण वाचा : मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३ हजार रुपये

मित्रांनो, मी आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल, व ही माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर ही माहिती महत्व पूर्ण वाटली असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद..


हे पण वाचा :
तरुणांनो तुमचे नाव मतदार यादीत नोंदणी केली का..?
शेतकरी मित्रांसाठी भारत सरकार मोसम विज्ञान विभागा कडून मौसम अँप तयार केले आहे लगेच डाउनलोड करा.
दादा ! दशपर्णी अर्क आपण घरी तयार करूया..
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना २०२३-२४
आता घरपोच शासकीय वाळू मिळवा फक्त ६०० रूपये प्रतीब्रास.
